



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
मुलचेरा(प्रतिनिधी)शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, विदर्भ संपर्क नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या अध्यक्षतेखाली, समर उर्फ टिल्लू मुखर्जी तालुकाप्रमुख मुलचेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख यांनी मार्गदर्शन करताना आगामी विधानसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन तालुक्यांमध्ये मजबूत करण्याकरिता गावागावांमध्ये शाखा तयार करणे, प्रत्येक गट ग्रामपंचायत अंतर्गत जनतेच्या समस्या-अडचणी शासन प्रशासनापर्यंत पोहचवून त्याचं लवकरात लवकर निराकरण करणे ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीयांच परिचय करून देणे तसेच शिवसेनेचा भगवा आणि चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा काम हे प्रत्येक शिवसैनिकाचा कर्तव्य आहे असे सांगण्यात आले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागा असे आव्हान करण्यात आले.
याप्रसंगी समन्वय समितीचे राजेंद्र लांजेकर ,तालुकाप्रमुख टिल्लू मुखर्जी , रबीन मिस्त्री उपतालुकाप्रमुख, बाबुल दास शहर प्रमुख, अमर भक्त शाखाप्रमुख, सुधीर पोद्दार, अविनाश दास तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.