जनसामान्यांनाचा नेता अजयभाऊ कंकडालवार -अहेरी विधानसभेत भाऊंचा वेगळेपण सिद्ध

147

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अजय कंकडालवार हे गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे समन्वयक आहेत. ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. दुर्गम भागातील गरीब, आदिवासी बांधवांना वेळोवेळी मदतीचा हात देत त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. नेहमीच सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे कंकडालवार जनसामान्यांमध्ये दरियादिल माणूस म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला त्यांच्या या जनसंपर्काचा नक्कीच लाभ होण्याची चिन्हे आहे.

अलीकडच्या काळात सामाजिक संवेदना कमालीच्या बोचट झाल्यात. आपुलकी जपणारी माणसेही दुर्मीळ होउ लागलीत. कुणाशी कुणाला काही देणघेणच नाही अशी भयावह व्यवस्था आपल्या समाजव्यवस्थेत जोराने शिरकाव करू लागलीय. ख-या अर्थाने बघितल तर हा सामाजिक चिंतनाचा मोठा विषय आहे. पण अशाही सामाजिक आणीबाणीत काही माणस मात्र निवळ माणुसकीच जोपासत नाही. तर ते राजकारणापलीकडे जात सामाजिक प्रश्नांना घेत मदतीचा हात देतात. सध्या गडचिरोलीच्या दुर्गम भागात अशा एका व्यक्तीमत्वाचीच जोरदार चर्चा होत आहे. अन् त्यांच नावं आहे अजय कंकडलवार. अहेरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय दुर्गम भागातून गेल्या काही दिवसात अनेक मोठया बातम्या समोर आल्या. अशा भागात कंकडालवार हे अतिशय ताकदीने अन् तेवढीच संवेदनशिलता ठेवत काम करित आहेत.

गडचिरोली जिल्हयातील सर्वात मोठा अहेरी उपविभाग अजूनही मुख्य प्रवाहापासून दुर आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघातील मोठा भाग अतिशय दुर्गम आहे. येथील नागरिकांच्या सामान्य समस्या सोडविण्यात लोकप्रतिनीधींना, प्रशासनाला अदयापही यश आल नाही. काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला जेसीबीच्या बकेटमधून पूढे पोहचविण्यात आल. अगदी अलीकडेच मातापित्यांना आपल्या दोन लेकरांचे प्रेत खांदयावर उचलून तब्बल पंधरा किलोमीटरचा वेदनादायी प्रवास करावा लागला.या घटनांनी समाजमन पेटल असतांना येथील सत्ताधा-यांना मात्र त्यांच्याशी काही देणघेण नसल्याची संतापदायक स्थिती आहे.

अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत नेतृत्वाची झलक दाखविली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्या मार्गदर्शनात कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. अन् अहेरी मतदारसंघात अगदी कमी कालावधीत पक्षाला मोठ यश मिळवून दिले. गडचिरोली जिल्हयात तिन विधानसभा मतदारसंघ आहेत. हे तिनही मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहेत. कंकडालवार हे ओबीसी प्रवर्गात येतात. ते विधानसभा निवडणूक लढवूही शकत नाही. पण त्यांनी आपल्या कामांचा धडाकाच लावला आहे. अनेक गरीबांच्या मदतीला धाऊन जाणारा नेता अशी त्यांची ओळख झाली आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या काही समस्या असल्या की ते कंकडालवार यांच्याकडे मोठया आशेने बघतात. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सक्रिय झाले आहेत. पण कंकडालवार यांनी सातत्याने आपले सामाजिक काम सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कामाचीच चर्चा आता मतदारसंघासह सर्वदूर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here