



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) येथील स्थानिक काँग्रेस कार्यालयात तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचा उल्लेख करण्यात आला. तसेच या नेत्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमात माजी आमदार पेंटाजी तलांडी यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचा उल्लेख केला.व त्यांच्या विचारांचे अनुसरण केले.
यावेळी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतीश जवाजी, माजी सभापती सगुणाताई तलांडी,कांग्रेस जेष्ठ नेते एम. ए. अली,के. ब्रह्मनंद, सामाजिक कार्यकर्ते निताताई तलांडी, शहर अध्यक्ष अब्दुल सलाम,एससी सेल अध्यक्ष सारय्या सोनारी,शंकर मंचरला, समय्या चिलमुला, सडवली मेडीजेरला,युवा कांग्रेस माजिद अली तसेच कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता व उपस्थित होते.