जंगलात आढळला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह -अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील घटना

661

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
अहेरी (प्रतिनिधी )
सिरोंचा तालुक्यातील युवकाने आलापल्ली येथील जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी, (दि.26) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. लिंगय्या गट्टू येलकुची (32) रा. पोचमपल्ली ता. सिरोंचा असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार लिंगय्या येलकुची मागील काही दिवसांपूर्वी पोचमपल्ली येथून आलापल्ली येथे आला होता. मागील काही दिवंसापासून तो आलापल्ली-एटापल्ली मार्गावर फिरत होता. अशातच आज पहाटेच्या सुमारास एटापल्ली मार्गावरील कचरा डेपोच्या मागील वनतलावालगत असलेल्या जंगलातील एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी लिंगय्या याचा मोबाईल आढळून आला. पुढील तपास ठाणेदार ईजपवार यांच्या नेतृत्वात अहेरी पोलिस करीत आहेत.

कर्जामुळे संपविली जीवनयात्रा?
अहेरी पोलिसांना घटनास्थळी लिंगय्याचा मोबाईल आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता मोबाईलमध्ये एक व्हिडीओ क्लिप आढळून आली. यामध्ये लिंगय्या याने अनेक नातेवाईकांकडून कर्ज घेतले असून कर्ज परतफेड करण्यास आपण असमर्थ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लिंगय्याने कर्जामुळे आपली जीवनयात्रा संपविल्याची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here