डिकेएसझेडसीएम ताराक्कासह 10 जहाल नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आत्मसमर्पण -एक करोडच्या वर होते बक्षिस

909

गडचिरोली(प्रतिनिधी )
माओवादी संघटनेमध्ये गेल्या 38 वर्षापासुन सक्रिय असलेल्या जहाल महिला माओवादी, डिकेएसझेडसीएम ताराक्कासह 10 जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यात दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य ताराक्का म्हणजे सीसीएम सोनु ऊर्फ भुपती याची पत्नी हिचा समावेश आहे. सोबतच तीन डीव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक उपकमांडर, दोन एसीएम व चार सदस्य पदावरील माओवाद्यांचाही यात समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे 1 कोटी 3 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बुधवारी गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 682 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 11 जहाल माओवादी शरण आले. यात विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ वत्सला ऊर्फ ताराक्का, (डिकेएसझेडसीएम, डिके मेडीकल टिम इंचार्ज), वय 62 वर्ष, रा. किष्टापूर, तह. अहेरी, जि. गडचिरोली, सुरेश बैसागी ऊईके ऊर्फ चैतु ऊर्फ बोटी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी), वय 56 वर्ष, रा. पल्ले, तह. भामरागड, जि. गडचिरोली, कल्पना गणपती तोर्रेम ऊर्फ भारती ऊर्फ मदनी (डिव्हीसीएम, कुतूल एरीया कमिटी) वय 55 वर्षे, रा. किष्टापूर तह. अहेरी, जि. गडचिरोली, अर्जुन तानु हिचामी ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश (डिव्हीसीएम, राही दलम), वय 32 वर्षे, रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली, वनिता सुकलु धुर्वे ऊर्फ सुशिला, (एसीएम, भामरागड दलम) वय 31 वर्षे, रा. चिमरीकल, तह. धानोरा, जि. गडचिरोली, सम्मी पांडु मट्टामी ऊर्फ बंडी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) वय 25 वर्षे, रा. बेरेलटोला, तह. पाखांजूर, छत्तीसगड, निशा बोडका हेडो ऊर्फ शांती (उप-कमांडर, पेरमिली दलम), वय 31 वर्ष, रा. मेंढरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, श्रृती उलगे हेडो ऊर्फ मन्ना (सदस्य, कंपनी क्र. 10), वय 26 वर्ष, रा. मोहंदी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, शशिकला पत्तीराम धुर्वे ऊर्फ श्रुती (सदस्य, पश्चिम सब झोनल प्रेस टिम) वय 29 वर्षे, रा. कोसमी नं. 1, तह. धानोरा, जि. गडचिरोली, सोनी सुक्कु मट्टामी (सदस्य, राही दलम) वय 23 वर्षे, रा. टेकामेट्टा, तह. पाखांजूर, जि. नारायणपूर (छ.ग.) व आकाश सोमा पुंगाटी ऊर्फ वत्ते (सदस्य, प्लाटुन क्र. 32 (नीब)) वय 20 वर्षे, रा. मेतावाडा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) यांचा समावेश आहे


नक्षल चळवळीला हादरा-

विशेष म्हणजे 22 जून 2024 ला गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी आणि सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री (आताचे मुख्यमंत्री) फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विगातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे.

जवानांचा केला गौरव –
कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये 2 डिव्हिसीएम माओवाद्यांसह एकुण 5 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणा­या विशेष अभियान पथकातील जवानांचा प्रशस्तिपत्र देवुन सत्कार फडणवीस यांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here