१ फेब्रुवारी पासून राज्यातील आश्रमशाळा भरणारा ११ वाजता -आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची घोषणा -प्रकल्प कार्यालयाच्या पुढाकाराने सोडे येथे आदिवासी पालक व लाभार्थी मेळावा

227

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी) आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळा १ फेब्रुवारी २०२५ पासून ११ वाजता भरणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी केली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत गुरुवार,२३ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ही घोषणा करताच विद्यार्थी,पालक व कर्मचाऱ्यांकडून टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याचे उद्घाटक व अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र धावत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग सुद्धा धावणार आहेत. आदिवासी विकास विभागाचा केंद्रबिंदू आदिवासी विद्यार्थी असून आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील एकही आश्रम शाळा गैरसोची राहणार नाही यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रम शाळांच्या विकासासाठी जलद गतीने तसा आराखडा तयार करून आदिवासी विकास विभागाला सहकार्य करावे असे आवाहन करून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.मिलींद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी गडचिरोली राहुल कुमार मीना(भाप्रसे),सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी भामरागड नमन गोयल(भाप्रसे), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अहेरी कुशल जैन (भाप्रसे), आदिवासी विकास नागपूरचे उप आयुक्त डिगांबर चव्हाण, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सह आयुक्त विनोद पाटील, सरपंच पूनम किरंगे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम,रेखा डोळस, गीता हिंगे, रवींद्र ओलालवार, आशिष पिपरे, रंजीता कोडाप ,सारंग साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी आश्रम शाळेमध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
लाभार्थी गुरुदेव उसेंडी, ममता हिचामी, हेमंत शेंदरे पालक रविंद्र उईके, विद्यार्थिनी शिवानी पोटावी ,अमिशा उसेंडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना शिवण यंत्र अर्थसहाय्य प्रत्येकी पंधरा हजार रुपये, विविध व्यवसाय करिता अर्थसहाय्य पन्नास हजार रुपये,काटेरी तार अर्थसहाय्यक पंचवीस हजार रुपये, शबरी घरकुल बांधकामा करिता अर्थसहाय्य एक लाख तीस हजार रुपये , सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार करिता दोन ते दहा लाख रुपये कर्ज वाटप ,बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहिरी साठी अडीच लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले.
लाभार्थ्यांमध्ये गुरुदेव उसेंडी , हेमनबाई केवास, आनंद नरोटे, केवळराम पोरेटी, ममता हिचामी, प्राची सिडाम , मंगल बोगा, मनीबाई पदा, स्नेहल उसेंडी, जिजाबाई पदा, भारती सयाम, चंदू उसेंडी आदींना या योजनांचा लाभ देण्यात आला. विविध यंत्रणेचे स्टाल यावेळी लावण्यात आले होते.विविध योजनांची माहिती देण्यात आली.
सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेच्या मुलींनी स्वागत नृत्य सादर केले.धानोरा येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुला मुलींने आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. जय सेवा जय जोहार मांदरी ग्रुप नवरगाव यांनी पारंपरिक वाद्याच्या साह्याने आदिवासी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना(भाप्रसे)यांनी केले. संचालन नेताजी गावळ व अंकलेश गणवीर तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख,सुधाकर गौरकर, मुख्याध्यापक एस.आर.मंडलवार, वासुदेव उसेंडी ,दादाजी सोनकर, मुकेश गेडाम ,सुधीर शेंडे, लालू नरोटे, रोशन पेंद्राम, संदीप फड,अनित टेंभुरकर, रवी आत्राम, किशोर मेश्राम,गुलाब बांबोळे,मेघा मडावी, सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा व प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक ,कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here