


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित शिवजयंती महोत्सव नगर पंचायत वतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहाने साजरा करण्यात आली.छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सिरोंचा येथील जयस्तंभ मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सिरोंच्याचे तहसीलदार निलेश होनमोरे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायांचे मुख्याधिकारी हमीद सय्यद,ज्येष्ठ पत्रकार महेश तिवारी,सिरोंचाचे पोलिस उप निरीक्षक वंगटी,नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा,नगर सेवक जगदीश रालाबंडीवार,नगर सेवक सतीश राचर्लावार,नगर सेवक इम्तियाज खान, नगर सेवक नरेश आलोने,स्वीकृत नगर सेवक राजू बंदेला,मारुती गाणपूरपु,जयंदर श्रीपती,प्रणित मारगोणी,संजू पेद्दापल्ली आदी उपस्थित होते
यावेळी नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा पुढे बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना समाजात सन्मान मिळवून देण्याचे काम केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या शिव जयंती पर्यंत सिरोंचा येथील छत्रपती शिवाजी चौकात भव्य दिव्य पुतळा उभारणार असे बोलत आपले मनोगत व्यक्त केले, त्यानंतर संस्कृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती त्यात सात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला पारितोषिक ठेवण्यात आली.यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय असा पारितोषित ठेवण्यात आली होते यावेळी नगर पंचायत कर्मचारी तसेच श्री राम सेना चे पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक थंगपल्लीवार यांनी केली तर आभार प्रदर्शन नगर पंचायत सिरोंचाचे अभियंता धर्मेंद्र घोडे यांनी केली