


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
घोट (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील एकमेव नवोदय विद्यालय असलेल्या चामोर्शी तालुक्यातील घोट येथील मुख्याध्यापक राजन बाळकृष्ण गजभिये यांनी शाळाबाह्य मुलांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना बाल रक्षक कार्य गौरव/बाल रक्षक पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे.
नवोदय विद्यालय घोटचे प्राचार्य राजन गजभिये यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न करीत आहेत. याशिवाय ते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाचे प्रबोधन करीत आले आहेत. गावोगावी जाऊन ते नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, आरोग्य आणि दारूच्या दुष्परिणामांबद्दल जागृत करण्यासाठी पथनाट्ये आणि शिबिरे आयोजित करतात. विशेष म्हणजे त्यांनी अनेक गरजूंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेत त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही करीत आहेत. त्यांनी अंकिसा येथील श्रीनिवास गजुला नावाच्या अनाथ मुलाला दत्तक घे त्यांनी संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलित नोकरी लावून देण्यासह लग्नही करुन दिले आहे. सध्या तो बीएमसी मुंबई येथे काम करतो. गजिभिये यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांची त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट बाल संरक्षक कार्य गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार नाशिक येथे आयोजित विशेष कार्यक्रमांतर्गत त्यांना सन्मानित करण्यात आली आहे.