कमलापूर येथे भव्य महिला ग्रामसभेचे आयोजन -तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात सरपंचा रजनीता मडावी यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

38

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी )आज दिनांक एक मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कामगार दिन साजरा केला जातो ठिकठिकाणी कामगार दिन व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाते. अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत च्या वतीने भव्य महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामसभेच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्य बाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवती अध्यक्षा प्रामुख्याने उपस्थित होत्या. ग्रामपंचायत सरपंच रजनीताताई मडावी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळेस गरजू स्तनदा माता, गरोदर माता, तसेच किशोरवयीन मुलींना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप सुद्धा करण्यात आले व भोजन कार्यक्रमाचा आयोजन सुद्धा करण्यात आला होता.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, सांभया करपेत माजी सरपंच,सारिका ताई गडपल्लीवार, विठाबाई भट अंगणवाडी सेविका, भगत मॅडम सामाजिक कार्यकर्त्या, मायाताई आईलवार ग्रामपंचायत सदस्य, भारतीताई भट महिला बचत गटप्रमुख, विद्याताई येजुलवार आशा गटप्रवर्तक, शिंदे साहेब व्यंकटेश कडारलावार ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार श्रीधर दुगीरालापाटील, ग्राम विस्तार अधिकारी कमलापूर, पंचफुला ताई गोदारी,इरसाद शेख, कैलास कोडापे, दिनेश अरगेली, महेश अडचरलावार, रुपेश पेनकुल, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here