


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी व प्राणहिता या नद्यावरील पुलांवर ठिकठिकाणी भेगा व खड्डे पडले असून संबंधित विभागाकडून या पुलांवरील भेगांवर तात्पुरता दुरुस्ती करण्यात आले आणि सदरहू काम सुद्धा नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांनी केली आहे.
यासंदर्भात सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) सार्वजनीक बांधकाम विभाग गडचिरोली यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात कॉंग्रेसने म्हटले आहे की, प्राणहिता नदीवरील पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंद पडले असून यामुळे पुलावर अंधाराचे सावट आहे. या अंधारामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संबंधित तत्काळ बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करावी. तेलंगणातल्या कालेश्वर येथे 15 ते 26 मेपर्यंत सरस्वती पुष्कर मेळा भरणार आहे. या पुष्कर पुण्य स्नानासाठी लाखो भाविक गोदावरी व प्राणहिता पुलावरून ये-जा करणार आहे. दोन्ही पुलावर कामासाठी टाकण्यात आलेल्या लोखंडी ड्रम, सळाख वाळू व गिट्टीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीपासून ते शिवाजी चौकापर्यंत सुरु असलेलं रस्त्याचे काम संथगतीने सुरु असून सदर काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
संबंधित विभागाने तात्काळ निवेदनावर दखल घेऊन एक-दोन दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास धर्मपुरी चौकाजवळ चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांचेसमवेत सिरोंचा ग्रा. पं. माजी उपसरपंच रवी सल्लमवार, शंकर मंचार्ला, उपसरपंच रामचंद्र गोगुला, लग्गा सत्यन्ना, सारय्या सोनारी, संपत अंबाला, समय्या चिलमूला, सडवली मेडिझेरला, भंडारी आदींनी निवेदनातून दिला आहे.