आ. होळी यांची नपं अध्यक्ष शेख यांची घेतली भेट – शहर विकासाबाबत केली चर्चा

150

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आज सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी सिरोंचा नपं अध्यक्षा फरजाना शेख यांचे घर गाठीत आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी शहर विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा केली.
आमदार डॉ. होळी सिरोंचा दौ-यावर असून यादरम्यान विविध समस्या जाणून घेत आहेत. या दौ-यादरम्यान 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी नपं अध्यक्षा फरजाना शेख यांची त्यांचे घरी जाऊन भेट दिली. या भेटीदरम्यान नपं उपाध्यक्ष बबलू पाशाही उपस्थित होते. यावेळी आमदार महोदयांनी शहर विकासात्मक बाबींवर चर्चा केली. तसेच नगर पंचायत क्षेत्रात सुरु असलेल्या विकासात्मक कामांची माहिती घेत विकासाला गती देण्याची सूचना केली.
यावेळी नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा,बांधकाम सभापती भवानी गणपूरपू, नगरसेवक नरेश अलोणे, इम्तियाज शेख,नुसरत बाबर,आकुदारी, स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,भगवान पिल्लीवार, नागेश दुग्यालासह अनेक प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here