


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली(प्रतिनिधी )विधानसभा क्षेत्राचे माजी आमतदार तथा कॉंग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी नुकताच जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या अतिदुर्गम अशा सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. या दौ-यादरम्यान त्यांनी अतिदुर्गम भागातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा घडवून आणली. तसेच आगामी निवडणूका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
डॉ. उसेंडी यांनी सिरोंचा तालुका दौ-यादरम्यान तालुक्यातील रेंगुठा, मोयाबीनेठा, येल्ला, परशेवाडा, दरशेवाडा या भागातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांचेकडून या भागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका लक्षात घेता तयारीला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांनी त्यांनी राज्य तसेच केंद्र शासनाच्या धोरणावर तोशेरे ओढले. राज्यात व केंद्रात सत्ता भाजपाची सत्ता असून जिल्ह्यातही भाजपाचे खासदार, आमदार असतांनासुद्धा मागील 9 वर्षात भाजपा सरकारने या भागात कोणतीही विकास कामे केले नसून साधी बस सेवा सुद्दा सुरू करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच या भागात नवीन रस्ते बनले नाही, वीज समस्या कायम असून आरोग्य सेवेच्या नावे बोंब आहे. यासह अनेक मुलभूत समस्यांची वाणवा आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांचा मनात दहशतीचा वातावरण आहे. तरी राज्य शासन यावर कोणतीही उपयोजना करत नसून सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याने भाजपा प्रति उद्रेकाची भावना आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची ग्वाही त्यांनी दिली.