Home Political आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी घेतले माजी आ. डॉ.नामदेव उसेंडी...




- गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी मागील सिरोंचा तालुका दौ-यावर आहेत. यादरम्यान त्यांनी तालुक्यातील अतिदुर्गम गावांना प्रत्यक्ष भेट देत येथील समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान त्यांनी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांची भेट घेत तालुक्यातील प्रलंबित समस्यांवर चर्चा घडवून आणली.
या चर्चेदरम्यान आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा घडवून आणित प्रलंबित समस्या तत्काळ मार्गी लावण्याची विनंती केली. यामध्ये प्रामुख्याने सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात, रंगय्यापल्ली येथील आरोग्य केंद्र तत्काळ सुरु करण्यात यावे, तालुक्यातील कोर्ला, कोप्पेला परिसरातील विद्यूत समस्या, रस्ते, पाणी, आरोग्य आदी समस्या तत्काळ सोडविण्यात यावे, यासोबतच तालुक्यातील दुर्गम भागातील विविध प्रलंबित समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती डॉ. नामदेव उसेंडी यांचेकडे केली. यावेळी डॉ. उसेंडी यांनी तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्फतीने मंत्रालयात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या चर्चेदरम्यान माजी आमदार नामदेव उसेंडी, आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम कांग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष ,सतीश जवाजी,साई मंदा, लक्ष्मण बोल्ले, किरण चिंताला उपस्थित होते.
Don`t copy text!