


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
बामणी (प्रतिनिधी )
तालुक्यातील बामणी उपपोलिस ठाण्याच्या वतीने दादालोरा खिडकी अंतर्गत नुकताच भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल तसेच वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत बामणीत व्हॉलीबॉल व कबड्डीचा थरार रंगला.
बामणी उपपोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेत ठाणे हद्दीतील अनेक संघांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी व्हॉलीबॉलसाठी 10 तर कबड्डी खेळाचे 12 संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अजय आत्राम, दिवाकर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयाजित व्हॉलीबॉल स्पर्धेत रोमपल्ली संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अव्वल स्थान पटकाविले. द्वितीय क्रमांक टेकडाताल्ला तर तृतीय स्थान कंबलपेठा संघाने पटकाविला. तर कबड्डी स्पर्धेत बामणी संघ अव्वल तर द्वितीय जाफ्राबाद तर तृतीय स्थान रोमपल्ली संघाने पटकाविला. यावेळी विजेत्या दोन्ही स्पर्धेतील तीन संघाना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जनजागरण मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी मदन मस्के, पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत बंडे, पोलीस उपनिरीक्षक सपाटे आदींसह अंमलदारांनी सहकार्य केले.