


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा(प्रतिनिधी )तालुका कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत येथील पौर्णिमा पौर्णिमा कावडे यांच्या पीएमएफएमई अंतर्गत मुरमुरे मशीनचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी बोबडे, कृषि अधिकारी नेटके, कृषि पर्यवेक्षक शिंगणे, कृषि पर्यवेक्षक वाघ, कृषि सहाय्यक एस. आत्राम आणि शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. ही योजना कृषी विभागामार्फत राबविली जात असून केंद्र सरकार यासाठी 35 टक्के अनुदान देते. 10 लाखापर्यंत लाभ घेता येतो. उर्वरित रक्कम बँकेमधून कर्ज स्वरूपात घेणे बंधनकारक आहे. यामध्ये कृषी उत्पादित घटकांचा अन्न प्रक्रिया उद्योग करणे जसे मिरची पावडर मशीन, आटाचक्की, शेवया मशीन, पापड मशीन, ज्यूस सेंटर करिता मिक्सर, ग्राइंडर इत्यादी मशीन उपलब्ध होतात. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिरोंचा यांनी केले आहे.