



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
अहेरी : तालुक्यातील आवलमारी येथील जयसेवा युवा मंडळ आवलमरी द्वारा भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली.
या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक वनपरीक्षेत्र व प्राणहीता वनविभाग सिरोंचा कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक आवलमारी ग्रामपंचायतचे सचिव आर.के.कोडापे कडून देण्यात येत आहे.
या सदर व्हाॅलीबाॅल कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार होते.सहउदघाटक माजी जि.प.सदस्य अजय नैताम होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी होते.
यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रां.प.सदस्य इंदाराम,अजय नैताम माजी जी. प.सदस्य,भास्कर तलांडे माजी सभापती प.स.अहेरी,नरेश गर्गाम,स्वप्निल मडावी,सचिन पांचर्य,शिवराम पल्लुरी,प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य परमेली,वासुदेव,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.