धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक मलय्या आत्राम यांचा पक्षाला राम राम -अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात काँग्रेमध्ये प्रवेश

298

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
अहेरी(प्रतिनिधी)तालुक्यातील वेडमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुंडेरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.धर्मारावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक व गेल्या 25 वर्षांपासून राट्रावादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी मल्लाजी आत्राम त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करत.

आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षात प्रवेश घेतले असून नवनिर्वाचित कार्यकर्तांच्या शाल व फुस्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

यावेळी माजी जिप.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,जयराम आत्राम,भीमराव आलाम,सीताराम कोडापे,नंदाबाई टेकाम,लता आलाम,सपना आलाम,लक्ष्मी आलाम,चंद्रकला टेकामसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here