गूढ मृत्यूसत्राचा अखेर उलगडा, अन्नपाण्यातून दिले विष; सून, मामीचे षडयंत्र

1534

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी(विशेष प्रतिनिधी) तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूसत्राचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले. या दोघींनी अन्न व पाण्यातून विष देत थंड डोक्यानी हे हत्याकांड घडवून आणले.

शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजय शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मयतांची नावे आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे.
२२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती.
चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले.

आणखी तिघांवर उपचार सुरु:
सध्या रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

इंटरनेटवर शोधले विषारी द्रव:
संघमित्रा कुंभारे हिने सुरुवातीला धतुरा नावाचे विषारी द्रव मागवले होते. मात्र, ते पाण्यात मिसळल्यावर हिरवा रंग झाला तसेच दर्पही येत होता. त्यामुळे तिने प्लॅन काही दिवस पुढे ढकलला. इंटरनेटवर सर्च करुन नंतर विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

हत्याकांडासाठी गुगल व युट्युबची मदत:
संघमित्रा हिने सासू सासऱ्यांना मारण्यासाठी गुगल आणि युट्युबची मदत घेतल्याची माहिती आहे. इंटरनेटवर सर्च करुन तिने विना रंगाचे, दर्परहित व हळूहळू शरिरात भिनणारे घातक द्रव्य परराज्यातून ऑनलाईन मागविल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here