


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
चंद्रपूर(प्रतिनिधी)सतत दारू पिऊन पत्नीला, मुली सोबत भांडण करणाऱ्या पतीला रागाच्या भरात पत्नी मुलगी व बाहेरगावावरून आलेल्या साळ्याने मिळून मारहाण केली यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात आज विजयादशमी दिनी घडली, नीलकंठ चौधरी वय 52 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपी पत्नी, मुलगी व साळ्याला अटक केली आहे.
शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नगीनाबाग परिसरात 52 वर्षीय नीलकंठ चौधरी आपल्या पत्नी व एका मुलीसह मोलमजुरी करीत राहत होता, परंतु दारू च्या अति व्यसनामुळे नेहमी घरी पत्नी व मुली सोबत भांडण करायचा, आज त्याचा घरी त्याच्या पत्नीचा भाऊ (साळा) विलास शेंडे, रा. सुशी दाबगाव, तालूका मूल येथून आला असता अश्लील शिवीगाळ सुरू केली त्यामुळे पत्नी पतित वाद सुरू झाला त्यानंतर भांडण झाले, भांडण हाणामारीत परावर्तित झाले, कंटाळलेल्या पत्नी व मुलीने व घरी आलेल्या साळ्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यावर बांबू ने व लोखंडी रॉड ने जबर मारहाण केली यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.
रामनगर पोलीस ठाण्यात भांदवि 302 अन्वये गुन्हा नोंद करीत आरोपी पत्नी मंगला चौधरी, साळा विलास शेंडे व मुलीला अटक करण्यात आली आहे,
पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.