


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क:
एटापल्ली(प्रतिनिधी) तालुक्यातील टीटोळा गावाचे पाटील लालसु वेळदा (वय 60 वर्ष) यांची नक्षल्यांनी हत्या केली.
ता.२३ नोव्हेंबर गुरुवार रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दोनशे पेक्षा जास्त संख्येने टीटोळा गावात आलेल्या नक्षल्यांनी गावाला घेराव घालून पाटील लालसू वेळदा यांची दगडाने ठेचून हत्या केली सदर घटना वादग्रस्त सुरजागड लोहखनिज उत्खनन कामात लालसू वेळदासह इतर गावकरी मदत करीत असल्याचा संशयातून नक्षल्यांनी लालसू वेळदा यांची हत्या झाल्याची बोलल्या जात आहे.
घटनेची तक्रार हेडरी पोलीस स्टेशनात करण्यात आली आहे.