नवलच…एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी -तपासात दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस

610

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(प्रतिनिधी )
आरटीओ कार्याल्यामार्फत एका वाहनाला एकच क्रमांक दिला जातो. मात्र गडचिरोली शहरात एकाच क्रमांकाचे दोन दुचाकी आढळून आले आहे. चोरीचे वाहन लपविण्यासाठी दुस-या वाहनाचा नंबर त्या वाहनावर लिहिण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली पोलिसांच्या तपासावरुन उघडकीस आले. याप्रकरणी जयघोष देशमुख (25) रा. गडचिरोली यास पोलिसांनी अटक केली आहे.
सवितस्तर वृत्त असे की, गडचिरोली येथील अमोल दुग्गा यांची एमएच 33 टी 0895 क्रमांकाची दुचाकी 10 एप्रिल रोजी चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार त्यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीनंतर दुग्गाही दुचाकीचा शोध घेत होते. दरम्यान त्यांना शहरातील आठवडी बाजारात एमएच 34 एटी 1901 क्रमाकांची दुचाकी दिसून आली. दुचाकीचा क्रमांक वेगळा असला तरी दुचाकी आपलीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खात्री पटताच याची माहिती दुग्गा यांनी गडचिरोली पोलिसांना दिली. पोलिसांनी अधिक माहिती काढली असता दुचाकी दुग्गा यांचीच असून त्याच्या दुचाकीला दुस-या दुचाकीचा क्रमांक दिल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जयघोष देशमुख याची उलट तपासणी केली असता जयघोषने दुस-याकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या नावावर न करता दुस-या विकली. तर अमोल दुग्गा यांची दुचाकी चोरुन तिच्यावर स्वत:कडील दुचीकीची नंबर प्लेट लावून तो फिरत असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूकीप्रकरणी जयघोष देशमुख याचेवर पोलिसांनी गुन्हा नोंद करीत अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here