मेडपल्ली गावाजवळ चारचाकीची झाडाला धडक; चालक जखमी

381

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
अहेरी (प्रतिनिधी )
आलापल्लीवरुन भामरागडकडे मार्गक्रमण करणा-या भरधाव चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनचालक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मेडपल्ली गावाजवळ घडली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे की पी. बी. 35 एन. 6934 क्रमांकाचे टाटा कंपनीचे चारचाकी वाहन शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आलापल्लीवरुन भामरागड मार्गे आरेंदा जात होते. दरम्यान मेडपल्लीपासून काही अंतरावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उतरीत झाडाला धडकली. सदर धडक एवढी जबरदस्त होती की, वाहन मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाले. सुदैवाने वाहनात चालकाव्यरीक्त अन्य नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात वाहन चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याला तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. वाहन चालकाचे नाव कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here