


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
आरमोरी(प्रतिनिधी) तालुक्यातील डार्ली येथील केशव लाकडे यांच्या शेतात निंदा काढण्यासाठी नरोटिमाल येथील 11 महिला नेहमीप्रमाणे शेतामध्ये काम करीत असताना अचानक आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मौसम बदलल्याने पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेताला लागून असलेल्या नागोबा मंदिरात पावसापासून बचाव करण्यासाठी मंदिरात संपूर्ण महिला आले असता काही वेळातच विजेच्या कडाडयासह पावसाला सुरुवात झाला होता यावेळी काही महिला मंदिराच्या गेटवर आणि काही महिला मंदिराच्या आतमध्ये असताना वीज त्यांच्यावर कोसळल्याने दुर्दैवाने त्यांच्यातील सौ विजया विलास गेडाम वय 40 वर्ष ही महिला जागीच ठार झाली व त्यांच्यातील सरिता सरावन मडावी वय वर्ष 55 व संगीता प्रमोद गेडाम वय वर्ष 23 या गंभीर जखमी असून त्यांना गडचिरोली येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले व 9 महिला किरकोळ जखमी असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वडधा येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळतच पोलीस स्टेशन आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन विजेच्या धक्क्याने ठार झालेल्या महिलेचा पंचनामा करून डेड बॉडी पीएम साठी पाठवण्यात आली असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहे.