किर्रर्र रात्री सागवान तस्करीचा डाव उधळला -बामणी वनविभागाद्वारे सव्वा तीन लाखांचे सागवान जप्त

539

प्राणहिता नदी मार्गे तेलंगणा राज्यात सागवान तस्करी करण्याच्या प्रयत्नात लपवून ठेवलेल्या 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सागवान लठ्ठे जप्त करण्याची कारवाई बामणी वनविभागाने पार पाडली. सोमवारी, किर्रर्र रात्री प्राणहिता नदी काठालगत सदर कारवाई करीत तेलंगणा राज्यात होणा-या सागवान तस्करीचा डाव उधळविण्यात वनविभागाला यश आले आहे.
पर्सेवाडा उपक्षेत्रातून प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात तस्करीसाठी सागवान माल लपवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती वनविभागाला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे सिरोंचा उपवनसंरक्षक पुनम पाटे यांच्या मार्गदर्शनात बामणी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रफुल झाडे यांच्या नेतृत्वात पर्सेवाडा, टेकडा, बेज्जुरपल्ली उपक्षेत्रातील वन कर्मचा-यांनी लंकाचेन गावाला लागून असलेल्या प्राणहिता नदी काठावर तपासणी केली असता तस्करीच्या दृष्टीने लपवून ठेवलेले 36 नग सागवान लठ्ठे 2.769 घनमीटर एवढा जप्त करण्यात आले. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी प्रफुल झाडे यांच्या मार्गदर्शनात गस्ती पथकाने केली असून तस्करांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here