प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली येथे राष्ट्रपती महात्मा गांधी व स्वतंत्र सैनानी लाल बहादूर शास्त्री जयंती साजरा

75

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क- (सिरोंचा प्रतिनिधी) 2 आक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने रंगय्यापली येथिल आरोग्य केंद्रात जगाला अहिंसा सत्य व सहिष्णुता यांची शिकवण देणारे व स्वतंत्र भारताचे महत्त्वाचे वाटेकरी तत्वज्ञ, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती व जय जवान जय किसान हे नारा बुलंद करणारे व भारताचे महत्त्वाचे स्वतंत्र सैनिक लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली येथे डॉ सचिन मडावी यांच्या हस्ते त्यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

महात्मा गांधी यांनी देशाला दिलेल्या योगदान व सत्य व अहिंसा याबद्दल देशाला दिलेल्या संदेश व लाल बहादूर शास्त्री यांच्या स्वतंत्र भारतातिल योगदान याबद्दल डॉ सचिन मडावी यांनी मार्गदर्शन केले..

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ अश्लेषा रामटेक, आरोग्य सहाय्यक चिपेली, आरोग्य सहायिका, कोड्रावार, नवीन जन्नमवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सुशांत सचिन मार्गोनी,सचिन सडमेक,संसारे आरोग्य सेविका,संजय,मधुकर नागेश,सुधाकर व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here