मंगळवारी सिरोंचात नपं कडून बतकम्मा मूर्ती लोकार्पण सोहळा

75

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-सिरोंचा (प्रतिनिधी) नगरपंचायत सिरोंचा अंतर्गत स्थानिक विठ्ठलश्वर मंदिर परिसरात बतकम्मा मूर्ती लोकार्पण सोहळा 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता नदीघाट परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

लोकार्पण नगराध्यक्षा फर्जना शेख यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. बतकम्मा देवी मूर्ती स्थापना दिवसानिमित्त बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा, यासाठी सिरोंचा नगर पंचायततर्फे पारितोषिक ठेवण्यात आले आहेत.

प्रथम पारितोषिक 10 हजार, द्वितीय 5 हजार, तृतीय 3 हजार असे तीन पारितोषिक ठेवण्यात आले आहेत. ज्या महिला आपली बतकम्मा सजावट किती प्रकारच्या फुलांनी करतात आणि किती मोठा आकार बनवतात याचे निरीक्षण करण्यात येईल. शहरातील सर्व प्रभागातील महिलांनी आपआपले बतकम्मा सजावट करून स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन नपं उपाध्यक्ष बबलू पाशा, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here