आरोग्य मेळाव्यात शेकडो नागरिकांनी घेतले जनआरोग्य मेळाव्याचे लाभ -उपपोलीस स्टेशन झिंगानूरचा उपक्रम

58

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )6 ऑक्टोबरला पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) M रमेश,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक,यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूर येथे भव्य जनआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून झिंगानूर गावाच्या प्रथम नागरिक सरपंच निलिमाताई मडावी,अध्यक्ष म्हणून उपपोलीस स्टेशन झिंगानूरचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कस्तुरवार, रा. रा. पो.ब दौंडचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक सिरीया मढावि दासू मढावि पोचाजि मढावि पेंटा कुळमेथे भारत मढावी पत्रकार रामचंद्र कुमरी तसेच कोपेला चे सरपंच सुरेश जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती

बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपपोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे,यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तदनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर येथील उपस्थित CCHO माधुरी निंबाळकर, मेश्राम,मडावी यांनी परिसरातील नागरिक,महिला यांची आरोग्य तपासणी करून रुग्णांना औषध वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करताना उपपोलीस स्टेशन झिंगानूर चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबद्दल माहिती दिली तसेच आगामी पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित महिला पुरुष विध्यार्थी यांना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध लोकोउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिपाई प्रफुल्ल चहारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपपोलीस स्टेशन चे प्रभारि अधिकारी अभिजीत तुतूरवाड सा पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे सा. रा रा पो ब दौंड चे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे साहेब पोलीस उपनिरीक्षक जाधव सा कस्तुरवार साहेब तसेच सर्व जिल्हा पोलीस अंमलदार आणि राज्य राखीव पोलीस बल दौड यांचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here