मेडीगट्टा प्रकल्प बाधितांचे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण -पुनर्रसर्वेक्षण करुन मोबदला देण्याची मागणी

173

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (विशेष प्रतिनिधी)
तेलंगणा(Telangana )राज्याच्या बहूचर्चित मेडिगट्टा प्रकल्पांतर्गत (medigadda project)जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा(sironcha) तालुक्यातील बहूतांश शेतजमीनी भूसंपादित करण्यात आल्या. मात्र, या प्रकल्पात (project )भूसंपादित शेतजमिनीपेक्षा अधिकची जमीन बाधित झाली आहे. अशात राज्य शासनाने जमिनीचे पूर्नसर्वेक्षण करुन संबंधित शेतक-यांना मोबदला देण्याचे ठोस आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही तालुक्यातील ब-याच शेतक-यांना मोबदला न मिळाल्याने न्याय मागणीला घेऊन मेडीगट्टा प्रकल्प बाधित शेतक-यांनी मंगळवार, (दि.7) ऑक्टोबरपासून सिरोंचा तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारले आहे.
(Medigadda project )मेडिगट्टा प्रकल्पांतर्गत भूसंपादन करण्यात आलेल्या शेत जमिनीपेक्षा जास्त शेतजमीन बाधित होत आहे. यासंदर्भात तालुक्यातील आरडा माल येथील शेतकरी तिरुपती मुद्दाम यांचेसह अनेक शेतक-यांच्या शेतजमीने प्रकल्प बांधल्यापासून (back watar)बॅक वॉटरमुळे पुरात बुडत आहेत. याचा फटका संबंधित शेतक-यांना दरवर्षी बसत आहे. प्रकल्प बांधकामादरम्यान प्रशासनाने बाधित शेतजमिनीचे सर्वेक्षण करीत सीमारेषाही आखली होती. यासंदर्भात प्रकल्प बाधितांना भूसंपादनासंदर्भात नोटीसही देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या यादीमध्ये तिरुपती मुद्दाम यांचेसह अनेक शेतक-यांची नावे नाहीत. यासंदर्भात प्रकल्प बांधितांनी अनेकदा शासन, प्रशासनाला निवेदन सादर करीत शेतक-यांना न्याय देण्यासाठी लक्ष वेधण्यात आले. मात्र, अद्यापही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने तिरुपती मुद्दाम या शेतकरीच्या नेतृत्वात मेडीगट्टा प्रकल्प बांधितांनी शेतजमिनीचे पुनर्रसर्वेक्षण करुन योग्य मोबदला देत न्याय द्यावा या मागणीला घेऊन सोमवारपासून सिरोंचा तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारले आहे. जोपर्यंत शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात येणार नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार प्रकल्प बांधितांनी केला आहे. उपोषणस्थळी तिरुपती मुद्दाम यांचेसह राम रंगुवार, मांतय्या आतला, संतोष रिक्कूला, विश्वनाथ रिक्कूला आदी मेडीगट्टा प्रकल्प बांधित उपस्थित आहेत.

फडवणीवासांकडून शुद्ध फसवणूक –
भूसंपादन प्रक्रियेसह योग्य मोबदला मिळण्यासाठी यापूर्वीही मेडीगट्टा प्रकल्प बाधित शेतक-यांनी उपोषण पुकारले होते. त्यावेळी मंजूर 128 हेक्टर शेतजमीनीचा मोबदला शासनाकडून देण्यात आला. परंतू अधिकतम शेतजमिनीचे पुनरसर्वे करून भुसंपादन करण्यात आले नाही. यादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान (DCM devendra fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पुनरसर्वेक्षण करुन संबंधित बाधित शेतक-यांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही पुनरसर्वेक्षण करण्यात न आल्याने त्यांचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप करीत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार मेडीगड्डा प्रकल्प बाधित उपोषणकर्त्या शेतक-यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here