



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा( प्रतिनिधी) वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय सिरोंचाचे वैद्यकीय अधिकारी डॉ हितेश वंजारी यांनी केले.
सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालय समोर व रुग्णालयाचा आवारात ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ हितेश वंजारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी डॉ.हितेश वंजारी,डॉ. श्रीनिधी,डॉ. हर्षद मानापुरे व अमित डांगोरे, देविदास मर्री,श्रीनिवास येतम,नंदलाल बिसेन,भाऊदादा खाडे,रामदास बिसे,श्वेता अरिगेला, नस्सीम शेख,श्वेता पेद्दापेल्ली,प्रकाश लाडे,मेश्राम,लक्ष्मण कलाकोटा,नंदा मैहानेसह रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
-डॉ. सुरेंद्र धाकड यांनी आभार मानले .