केंद्रीय गृह मंत्र्याच्या दौऱ्यावर नक्षल्यांची हिंसक कारवाई -नक्षल्यांच्या कारवाया उफाळल्या -गडचिरोली जिल्ह्यात उडाली खळबळ

1275

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क

गडचिरोली (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोलीत रविवारी (दि.17) दाखल होत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नक्षलवाद्यांनी आपल्या हिंसात्मक कारवायांमधून आज शनिवारी (दि.16) जोरदार धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणा-या पर्लकोटा नदीवरील पुलावर नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


भामरागड परिसरात पर्लकोटा नदीजवळ नक्षल्यांनी काही स्फोटके पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्याच्या अनुषंगाने गडचिरोलीहून एक (BDDS) बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले. शोध अभियानादरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (आयईडी) सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (आयईडी) स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (आयईडी) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला. सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही. तसेच या परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here