अनेक कर्मचारी पोस्टल बॅलेटपासून वंचित

103

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क- (मुलचेरा प्रतिनिधी )
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही पोस्टल बेलेट प्राप्त झालेले नसल्याच्या तक्रारी आहेत. यात मुख्यत्वे स्थानिकांसह बाहेरच्या जिल्ह्यातील जवळपास 50 ते 70 टक्के कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट आलेले नाहीत. पोस्टल मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने संबंधित कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी प्रशासनाने पोस्टल मतदानाची सोय केली आहे. पोस्टल मतदानासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील निवडणूक कर्तव्य पार पाडणा-या अनेक कर्मचा-यांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याच्या तक्रारी कर्मचारी संघटनेकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे सदर कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबरपर्यंत सर्व कर्मचा-यांना पोस्टल बेलेट उपलब्ध करून द्यावे, पोस्टल बॅलेट मतदानासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी, निवडणूक कर्तव्य बजावित असलेले कर्मचारी, पोलिस अंमलदारांना पोस्टल मतदानासाठी मुदत द्यावी, झालेले पोस्टल बॅलेट मतदान त्या कर्मचाऱ्याच्या मूळ जिल्ह्यात मतमोजणी तारखेपूर्वी वेळेत पोहचतील यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, 23 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त होणा-या मतपत्रिका मतमोजणीसाठी ग्राह्य धराव्यात अशी मागणी संघटनेचे डॉ ललितकुमार शनवारे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here