


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी)
स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने शहरात विकास कामांचा धडाका सुरु केला असून याअंतर्गत शहरातील विविध वार्डात विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत प्रभाग क्र. 5 मध्ये रस्ते, नाली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील प्रभाग क्र. 5 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या अध्यक्षतेखाली आय.बी.एन.लोकमत 18 चे जेष्ठ पत्रकार महेश तिवारी यांचा हस्ते पार पडले. यावेळी नप. उपाध्यक्ष बबलू पाशा म्हणाले, नगरपंचायत निवडणूकीच्या कालावधीत शहरवासींयाना समस्या सोडविण्याचे वचन दिले होते. या विकासात्मक कामाच्या माध्यमातून आमची वचनपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. मागील अनेक वर्षापासून शहरातील विविध वार्डासह प्रभाग क्र. 5 मध्ये रस्त्यांसह नालीचे बांधकाम प्रलंबित होते. मात्र नगर पंचायत प्रशसनाने या वार्डात रस्ते, नाली बांधकामाचा शुभारंभ करुन कामाला गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी प्रभागातील नगसेवक रंजीत गागापुरपूवार वार्ङ क्र 5 चे नगरसेवक रंजीत गागापुरपुवार, सितापती गटटू,मनीषा चल्लावार, अशिक हुसेन, अर्शद खान, विनय चाकिनरपूवार, रामचंद्रमुर्ती चित्तावार, जावेद खान, मंतेश गगापूरवार,जीतू अङेपू , अब्दुल कलाम, अब्दुल सलाम, श्रीनिवास दागम, मंतेश पोलोजी, प्रणीत मारगोनीवार, नागराज गोर्लावार, किरण दागम, शाबीर खान, प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.