


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा शहरातील श्री विराट पोतुलूरी वीर ब्रम्हेंद्रस्वामी मंदिर अत्यंत पुरातन मंदिर असून पंचाळ विश्वकर्मा समाजा बांधवांसह परिसरातील भाविकांचे सदर देवस्थान श्रद्धास्थान आहे. या पुरातन मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पंचाळ विश्वकर्मा समाजबांधवंनी नगरंपचायत प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.
पंचाळ विश्वकर्मा समाजबांधवांनी न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांची प्रत्यक्ष भेट घेत मंदिर विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली. विराट पोतुलूरी विर ब्रम्हेंद्रस्वामी मंदिर अत्यंत पुरातन मंदिर असून या मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंट कॉंक्रीट रस्ता उभारण्यास मंदिराचा सभोवताल संरक्षण भींतीचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या बांधकामासाठी नगर पंचायत प्रशासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पंचाळ विश्वकर्मा समाजबांधवांनी न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांचेकडे निवेदनातून केली. यावेळी न. पं. उपाध्यक्षांनी समाजबांधवाना सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर विकाससाठी निधीकरिता वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करताना पंचाळ विश्वकर्मा समाजबांधव बहूसंख्येने उपस्थित होते.