आएसओ मानांकन प्राप्त करणारी तालुक्यातील सुंदरनगर पहिली ग्रामपंचायत

191

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क- मुलचेरा(प्रतिनिधी) तालुक्यातील सुंदरनगर ही ग्रामपंचायत पहिली आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ग्रामपंचायत ठरली आहॆ.यापूर्वी ग्रामपंचायतिला स्मार्ट ग्राम पुरस्कार ,महाआवास अभियान पुरस्कार ,दिन दयाल उपाध्याय योजना ,तंटामुक्त असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून नुकताच ग्रामपंचायतला आयएसओ आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानक वितरित करण्यात आले आहॆ.नुकताच सुंदरनगर ग्रामपंचायत च्या सभागृहात आयएसओ मानांकन सोहळा आयोजीत करण्यात आला होता.मागील चार वर्षांपासून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पिना घुगलोत येथे कार्यरत आहेत .शासनाच्या विविध योजना प्रभावी पणे गरजू पर्यंत पोहचविण्याचे कार्य घुगलोत करीत असून आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी गट विकास अधिकारी एल बी जुवारे यांच्या मार्गदर्शनाखाली घुगलोत यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी वेद असोसिएटचे ऑडिटर विनोद कोल्हे यांनी आयएसओ चा दर्जा काय याची व्याप्ती सांगीतली याप्रसंगी सरपंच जया मंडल,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य रंजीत स्वर्णकार,शामल पाल ,अतिन्द्र शील,निखिल इज्जतदार,सपना विश्वास,कविता साना ,सुव्रत बेपारी ,कुसुमिता चॅटर्जी ,निभा मंडल,पल्लवी शील,बेबीराणी बर्मन,ग्रामपंचायत अधिकारी पिना घुगलोत,दीपक सरकार ,चयन शील,पवित्र मंडल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here