


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतचे उपसरपंच बापू आतकुरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक बी. ए. मारबोईना यांनी सांभाळली. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख आय. जे. खान, पदवीधर शिक्षक एस. जी. धानोरकर, शिक्षक एल. एम. सद्दी व कु. व्ही. आर. वरगंटीवार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये विचारमूल्यपूर्ण भाषणे सादर करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. एकूण २३ विद्यार्थ्यांनी या भाषण सत्रात सहभाग घेतला.
उपसरपंच बापूजी आतकुरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रेरणादायी नोटबुक्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवीतील कु. साईना दुर्गम व कु. अक्षरा आघाडी यांनी उत्कृष्टरीत्या केले. आभार प्रदर्शन कु. कावेरी गुरनुले हिने साजेस्या शब्दात मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी अभिमान निर्माण झाला.