


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) व भाजपा मित्र पक्षाचा विजयी झालं आहे. माजी पं. स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम व भाजपाचे सहकारी नेता सतीश गंजी वार, श्रीहरी भंडारी यांच्या नेतृत्वात हा एकतर्फी विजय मिळवित आविका संस्थेवर कब्जा करण्यात यश आले आहे.
अंकिसा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी, (दि.16) आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या 5 जागेसाठी ही निवडणूक झाली. यात सर्वसाधारण 2 जागा, इतर मागासवर्ग 1, एससी 1, एनटी 1 अशा 5 जागांसाठी लढत झाली. तत्पूर्वी एसटी प्रवर्गातील 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक झालेल्या जागांसाठी बॅलेट पेपरवर मतदान झाले. 4 वाजता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात बाजार समिती अध्यक्ष असलेले शेतकरी सहकारी पॅनलचे सतीश गांजीवर, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी यांच्यासह नागेंद्र चिटकेशी, मनोहर अरिगेला, प्रवीण अकुला, कार्तिक जंगम, पल्लम मारालू यांचा दणदणीत विजय झाला. विरोधी गटाच्या सर्व उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला. निवडणूकीनंतर तालुक्यात राकॉं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी राकॉं तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सय्यद सालार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी बहूसंख्येने उपस्थित होते.