दुचाकी अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर -चामोर्शी तालुक्यातील घटना

1449

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
चामोर्शी (प्रतिनिधी)
पत्नीला घेवून चामोर्शीकडे येणा-या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज, 23 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील दर्शनी गावाजवळ घडली. मोरेश्वर दादाजी सातपुते (60) रा. चामोर्शी असे मृत पतीचे तर सुमन मोरेश्वर सातपुते (55) असे जखमी पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी येथील रहिवासी मोरेश्वर सातपुते हे पत्नी सुमन सातपुते हिला आणण्यासाठी सावली तालुक्यातील केरोडा येथे दुचाकीने गेले होते. ते गडचिरोली मार्गे चामोर्शी येथे परत येत होते. उन्हाचे दिवस असल्याने पाणी पिण्यासाठी त्यांनी दुचाकीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेगावर नियंत्रण न राहिल्याने दर्शनी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला लोखंडी खांबाला दुचाकीची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली पत्नी सुमन ही गंभीर जखमी झाली. अपघात घडताच जखमी सुमनला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here