


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
होप फाउंडेशन सिरोंचा तथा जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा सिरोंचा येथे किशोरवयिन मानसिक आरोग्य या विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 26 एप्रिल रोजी करण्यात आले होते. प्रश्न मंजुषा स्पर्धेत श्रृती हेमंतकुमार कासर्लावार हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिप शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. मारस्कोल्हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचा नपंचे उपाध्यक्ष बबलू पाशा, शिक्षक के. वाय. जगधाबी, शिक्षिका रंजना मंदरे, शिक्षक श्याम मादेशी, होप फाउंडेशन सिरोंचाचे अध्यक्ष नागेश मादेशी उपस्थित होते. प्रश्न मंजुषा स्पर्धेत एकूण 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी प्रथम श्रुती हेमंतकुमार कासर्लावार, द्वितीय जियानाज काजीम हुसेन, साई गोतुरी तीला तर रंजित तिरुपती कुम्मरी यांना प्रोत्साहन क्रमांक देऊन गौरवण्यात आले. यावेळी नागेश मादेशी यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य आणि ताण, तणाव व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले. नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी किशोरवयिन अवस्था मानवी जीवनातील सुंदर क्षण आहे. या अवस्थेत होणाऱ्या बदलाला सामोरे जा. कितीही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नका. हिम्मत हरू देऊ नका, असे आवाहन केले. मुख्याध्यापक मारस्कोल्हे यांनी मानसिक आरोग्य हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या संवेदनशील विषयावर होप फाउंडेशन काम करत आहे, हे नक्कीच अभिनंदनीय असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक के. वाय. जगधाबी तर आभार शिक्षक श्याम मादेशी यांनी मानले.