


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी )महाराष्ट्र दिनानिमित्य छत्रपती शिवाजी महाराज चौक सिरोंचा येथे राजे धर्मराव विद्यालय सिरोंचा सन 1998- 99 इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेतलेले सर्व वर्गमित्रांकडून वाटसरुंकरीता पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.
सदर पाणपोईचे उद्घाटन तहसिलदार निलेश होनमोरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार हमीद सय्यद, राजे धर्मराव विद्यालयाचे मुख्याध्यापक व राजे धर्मराव विद्यालय सिरोंचा सन 1998- 99 इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेले सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सदर माजी विद्यार्थ्यांकडून यापूर्वी सिरोंचा शहरात निःस्वार्थपणे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, हे विशेष.