



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
मुलचेरा (प्रतिनिधी)
मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे मुक्तीपथ तालुका टीम, ग्राम पंचायत समिती, मुक्तीपथ गाव संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसक कृती करून 32 लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन विक्रेत्यांवर अहेरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
लगाम येथे अवैद्य दारू विक्री बंदी करिता दारू विक्रेत्यांना नोटीस देऊन दारू विक्री बंदीकरीता समज देण्यात आली. परंतु दारूविक्रेत्यानी नोटिसला न जुमानता अवैद्य दारू विक्री बंदी न केल्याने मुक्तीपथ तालुका टीम, ग्राम पंचायत समिती, मुक्तीपथ गाव संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसक कृती करून सात दारू विक्रेत्यांच्या घरी तपासणी करण्यात आली. यात नंदू मडावी 10 लिटर, बाबुराव कोल्हापूरे 12 लिटर व संदिप मोहूर्ले 10 लिटर अशी एकूण 32 लिटर दारू जप्त करून अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत तिन्ही दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्ती पल्लवी तुपसुंदर, सरपंच दिपक मडावी, पोलीस पाटील गिरमाजी मडावी, मुक्तीपथ गाव संघटना अध्यक्ष विजया मडावी, मुक्तीपथ गाव संघटना सचिव सुरेखा सोयाम, सुरेखा सिडाम, वनश्री पेंदाम उपस्थित होते.