



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
कोरची (प्रतिनिधी)
कर्जाला कंटाळून शेतक-याने गावालगतच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी, (दि.23) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुका मुख्यालयापासून 14 किमी अंतरावरील डाबरी टोला येथे उघडकीस आली. रुपसिंग रायसिंग घावळे (36) रा. डाबरी टोला असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रुपसिंग घावळे या शेतक-यावर छत्तीसगड येथील बॅंकेचे 44 हजाराचे कर्ज होते. सदर कर्ज बसे फेडावे या विवंचनेत तो अनेक दिवसांपासून होता. दरम्यान गावालगतच असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती प्राप्त होताच कोरची पोलिसांनी घटनास्थळ गाठित पचंनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. स्थानिक पोलिस पाटलांनी याची कोरची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास कोरची पोलिस करीत आहेत.