



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली (प्रतिनिधी)
धानोरा तालुक्यातील पेंढरी उपविभागांतर्गत येत असलेल्या जारावंडी पोलिस ठाणे हद्दीतील वंडोली जंगल परिसरात 17 जुलै 2024 रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत 7 पुरुष व 5 महिलांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेतील मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 196 अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्यात येत आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी किंवा या घटनेविषयी माहिती असलेल्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्यासमोर, जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून 21 दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन, उपविभागीय दंडाधिकारी नमन गोयल यांनी स्पष्ट केले आहे.