आरडा वळणावर अपघात(Eccident) अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार; एक जखमी -सिरोंचा-असरअल्ली महामार्गावरील घटना

367

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) तालुक्यातील सिरोंचा-असरअल्ली महामार्गावरील आरडा(arda ) गावाजवळील वळणासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील(two Wheeler) एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी, (दि.27) रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली. यशवंत पोचम कोटरंगी (25) असे मृतकाचे नाव असून वसंत मोडी लेंडगुरी (40) दोघेही रा. रंगय्यापल्ली असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार यशवंत कोटरंगी व वसंत लेंडगुरी हे दोघेही दुचाकीने छत्तीसगड राज्यातील भूपालपठणम लग्न कार्य आटोपून सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली स्वगावाकडे येत होते. दरम्यान सोमवारी, रात्री 7(night 7 pm) वाजताच्या दरम्यान सिरोंचा-आसरअल्ली मार्गावरील आरडा (arda) वळण मार्गासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील यशवंत कोटरंगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वसंत लेंडगुरी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला. अपघातातील जखमींना तत्काळ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात(Rural hospital) दाखल करण्यात आले. घटनेची माहिती प्राप्त होताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल(fir) करण्यात आला असून पुढील तपास सिरोंचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा पोलिस अमलदार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here