


गोदावरी न्यूज नेटवर्क –
चामोर्शी (प्रतिनिधी )
तालुक्यातील घोट येथील एका महिलेचा विनयभंग करुन शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देणा-या आरोपीस चामोर्शी न्यायालयाने 3 वर्षाचा सश्रम कारावाची शिक्षा ठोठावली आहे. मानीष चिमनलाल उपाध्ये (23) रा. घोट असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी मानीष उपाध्ये हा घोट येथील एका महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी देवून घटनास्थळावरून निघून गेला. या घटनेची तक्रार फिर्यादी महिलेने घोट पोलिस मदत केंद्रात दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी तपास पूर्ण करून साक्षदाराचे बयाण नोंदवून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षांनी साक्षदाराचे बयाण नोंदवून व दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकूण गुन्हा सिद्ध झाल्याने चामोर्शी येथील न्यायदंडाधिकारी दीक्षा डि. विघ्ने यांनी आरोपीस तीन वर्षाचा सश्रम कारावास, 2 हजाराचा दंड, कलम 294 भादंवी अन्वये तीन महिलने सश्रम कारावास व 500 रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात तपासी अंमलदार पोलीस हवालदार मुरारी गेडाम यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. डि. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.