महामार्गाच्या कामासह विविध मागण्यासाठी रेपनपल्लीत पाच तास चक्काजाम – दोन्ही बाजूचे वाहने चार तास वाहतूक ठप्प

294

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी(प्रतिनिधी )अहेरी तालुक्यातील रेपणपली येथे राष्ट्रीय महामार्ग 353 C वर आज रोजी संतोष ताटीकोंडावार सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आलापली ते सिरोंचा महामार्गाचे काम तसेच विविध मागण्या घेऊन सकाळी ७.०० वा. पासून आंदोलन सुरू करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रारंभ करण्याचे लेखी आस्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने पोलीस विभागाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
आलापली ते सिरोंचा महामार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, वनहक्क धारकांना कायमस्वरूपी पटठे देणे, गृह चौकशी करून जात प्रमाणपत्र देणे, छलेवाडा स्वातंत्र्य ग्राम पंचायत घोषित करणे असे विविध मागण्या घेऊन रेपनपली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असता महामार्ग संबंधित अधिकारी भेट दिली अनेक समस्यांचे चर्चेअंती १६ नोव्हेंबर पासून रस्ता बांधकाम सुरू करण्याचे लेखी स्वरूपात हमी दिले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी जिमलगठ्ठा चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, रेपनपली चे पोलिस निरीक्षक गोविंद कटिंग, वनपरिक्षेत्रअधिकारी रेपणपली खरतड , वनपरिक्षेत्र अधिकारी चौके,रामजीत यादव महामार्ग तपासणी अधिकारी, वैद्य असिस्टंट इंजिनियर, शैलेंद्रसिंग यादव कंत्राटदार,कैलास सताळे यांनी आंदोलनास भेट देऊन समस्यांवर चर्चा घडवून आणले. या प्रसंगी संतोष ताटीकोंडावार सामाजिक कार्यकर्ते, प्रफुल नागुलवार उपसरपंच तिमरम,रजनीता मडावी माजी सरपंच कमलापूर, सुनील रत्नम,योगेश कोतकोंडावार, प्रभादेवी येजुलवार आदी शेतकरी बांधव व गुड्डीगुडम, निमलगुडम, कमलापूर, छलेवाडा, रेपणपली, राजाराम तिमरम येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

“आलापली ते सिरोंचा महार्गाचे दयनीय अवस्था व होणारे अपघात आणि दवाखान्यात जाण्या-येण्यासाठी होणारे अडचणी लक्षात घेता नागरिकांचे खुप हाल होत आहेत तरी महामार्गाचे काम तात्काळ सुरू करावी.आणि कामात वन विभाग आडकाठी येत असेल तर वन विभाग कार्यालयासमोर आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल”
-संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

“प्रतिबंधक क्षेत्रात काम करण्याचे कार्यवाही शासनाकडे सुरू आहे परंतु नॉन प्रतिबंधक क्षेत्रात काम करण्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिले असून येत्या १६ नोव्हेंबर पासून कामाला प्रारंभ करण्यात येईल रस्ता आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार ”
-इंजि.वैद्य,असिस्टंट इंजिनियर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here