


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा (प्रतिनिधी )
नगर पंचायत तसेच तहसिल प्रशासन सिरोचांतर्फे शहरातील महिलांच्या संदर्भात असणा-या शासकीय योजना लोकाभिमूख करुन त्यांची अंमलबजावणी करण्यास्तव मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
या अभियानांतर्गत सिरोंचा शहरातील 17 प्रभागाकरिता पाच ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नगरम चौक, जिल्हा परिषद हायस्कुल सिरोंचा, पोलिस ठाण्यासमोर भोई समाज मंदिर, जुनी ग्राम पंचायत सिरोंचा या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शहरातील महिलांना सेवा पुरविण्यासाठी नगर पंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय येथे आवश्यक कागदपत्रे गोळा करणे सुरु असून गरजु महिला व मुलींनी संबंधित कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्षा फरजना शेख, तहसीलदार तथा मुख्याधिकारी जितेंद्र शिकतोडे, उपाध्यक्ष बबलू पाशा आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी केले आहे.
शिबिरात या योजनांचा लाभ :
आयोजित शिबिरात महिलांना नि:शुल्क व अतितत्काळ आयुष्यमान भारत कार्ड, निवडणूक कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड, पीएम विश्वकर्मा कार्ड, संजय गांधी निराधार योजना, जन्म-मृत्यू दाखला, अटल पेंशन योजना आदी सेवा पुरविण्यात येणार आहे.