


सिरोंचा (प्रतिनिधी ): “बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विभिन्न जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधण्याचा व राष्ट्रीय एकता अबाधित राखण्याचा स्तुत्य प्रयत्न संविधानात केलेला आहे. त्यात काळानुरूप बदलाची तरतूद ठेवली आहे. भारतीय लोकशाही एक अद्वितीय दस्तऐवज असून संपूर्ण भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही समजून सर्वार्थाने अंगिकारली तरच स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये शाश्वत स्वरूपात अस्तित्वात येतील.” असे मौलिक मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जणगाम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहताना केले. ते सिरोंचा येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारक सिरोंचा येथे बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.मिलिंद बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वेंकटी दुर्गम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, मिलिंद बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वेंकटी दुर्गम, मिलिंद बहुद्देशीय संस्थेचे सचिव अमृतराव वाळके यांच्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले असून उपस्थित भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविका कावरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरे सर यांनी केले. उपस्थितांचे आभार शंकर कावरे यांनी मानले. कार्यक्रमाला सिरोंचा तालुक्यासह ग्रामीण भागातील भीमसैनिक व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.