लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सूरजागड आयरन ओर माईन्स येथे प्रजासत्ताक दिनी हेडरी येथील वयोरुद्ध पांडू कोत्तू तेलामी हस्ते ध्वजारोहण संपन्न

82

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :एटापल्ली प्रतिनिधी

लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सूरजागड आयरन ओर माईन्स येथे प्रजासत्ताक दिनी हेडरी येथील वयोरुद्ध पांडू कोत्तू तेलामी हस्ते ध्वजारोहण संपन्नगोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
एटापल्ली(प्रतिनिधी )भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम माईन्स कॉम येथील मैदानावर हेडरी येथिल 90 वयोरुद्ध श्री. पांडू कोत्तूं तेलामी यांच्या हस्ते संपन्न झाला असून यांना संचालक यांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आल.

लॉयडस मेटल कंपनी कडून अधिकारी, कर्मचारी यांचे विविध खेळाची आयोजन करण्यात आले होते. यात विजेता संघाना मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . या वेळी लॉयडस मेटल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here