उप पोस्टे बामणी येथे मोठया थाटात शिवजन्म उत्सव साजरा

116

 


19 फेब्रुवारी 2024 रोजी उप पोलीस स्टेशन बामणी येथे 394 वी शिव जयंती मोठया थाटात साजरी कऱण्यात आली

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्लासफोर्डपेठा येथील माजी मुख्याध्यापिका टेंबरे मॅडम यांचा शैक्षणिक कार्याबद्दल प्रभारी अधिकारी मस्के साहेब यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला तसेच हद्दीतील साठ ते सत्तर महिलांना साडी चोळी, शिलाई मशीन,ब्युटी पार्लर चेअर चे वाटप करण्यात आले
तसेच आरोग्य विभागामार्फत बीपी,शुगर, शिकलसेल ची मोफत तपासणी करण्यात आली
व सर्वांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सपोनि/मस्के साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगडे सर (संत मनवदयाल विद्यालय बामणी) टेंबरे मॅडम,
पोउपनी/बंडे साहेब, पो
उपनि/सपाटे साहेब, अजय आत्राम (सरपंच वेंकटापुर), समय्या कुळमेथे, मनोज
मंचेलवार व गावातील महिला नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पो अंम/संतोष इंगळे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here