



गडचिरोली(प्रतिनिधी )
लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे लॉयड्स मेटल अॅन्ड एनर्जी लिमीटेडद्वारे प्रत्येक महिन्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 20 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबितरा लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्यासह कंपनीच्या 50 अधिकारी, कर्मचा-यांनी रक्तदान केले.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी नक्षल प्रभावित सुरजागड परिसरात मुलभूत आरोग्य सुविधा मिळणे कठीण होते. मात्र परिसरातील आदिवासींना उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळण्याकरीता लॉयड्स मेटल्स कंपनीच्या पुढाकाराने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काली अम्मल हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. या दवाखान्यामुळे परिसरातील आदिवासी गरीब व गरजुंना मोठा आधार झाला आहे. याठिकाणी तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल 8 नोव्हेंबर 2023 ला सामान्यांच्या सेवेत दाखल झाले. या ठिकाणी दहा तज्ञ डॉक्टर, 40 हून अधिक आरोग्य कर्मचारी परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटलमध्ये सुरजागड, हेडरी, गट्टा, जांभिया, एटापल्ली, भामरागड तालुका, आलापल्ली, अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, रक्तदान शिबिरात सर्व समूहातील सदस्यांनी दर महिन्याला किमान 50 युनिट रक्त देण्याचे आश्वासन दिले.